
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. सकाळी कणकवली तालुक्यातील जानवली येथे अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा अपघात दुपारी 2:30 सुमारास तरळे पेट्रोल पंप समोर महामार्गावर झाला. त्यामध्ये गोव्याच्या दिशेने येणाऱ्या कारने पेट्रोल पंपा वर येणाऱ्या दुचाकी स्वराला धडक दिली. यामध्ये शीडवणे येथील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना एपीआय मनोज पाटील यांनी तत्परतेने पोलीस गाडीत घेऊन कासार्डे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत रुपेश गुरव, राज आघाव, शिंदे व चालक राजू उबाळे हे देखील उपस्थित होते.