
दोडामार्ग : दोडामार्ग बांदा मार्गावर कळणे येथील एका अवघड वळणावर मालवाहू ट्रक रस्त्याच्या मध्यभागी बंद पडल्याने एकेरी वाहतूक सुरु होती. मात्र रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणारा ही ट्रक बंद पडल्याने दोन्ही बाजूची वाहने पूर्णपणे ठप्प झाली.
याबाबत अधिक माहिती अशी, दोडामार्ग बांदा मार्गावरून दोडामार्गच्या दिशेने येणारा मालवाहू ट्रक कळणे येथील एका अवघड वळणावर रस्त्याच्या मध्यभागी बंद पडला. रस्त्याच्या साईड पट्टीवरून बंद पडलेल्या ट्रकला बाजू घेऊन जाणारा दुसरा मालवाहू टॅम्पो त्या ट्रकच्या बाजूला जाऊन बंद पडला. त्यामुळे दोन्ही बाजूची सर्व वाहतूक बंद झाली होती. स्थानिक ग्रामस्थ व ट्रक चालक यांनी गटारावर माती टाकून पुन्हा एकेरी वाहतूक सूरु केली. ही घटना गुरुवारी सकाळी घडल्यामुळे काम निमित्त जाणाऱ्या सर्व वाहन चालकांचा खोळंबा झाला.