वैभववाडी ITI मधील विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान..!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 27, 2024 13:08 PM
views 186  views

वैभववाडी : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फिल्ड प्रोजेक्टर या प्रकल्पाला राज्यस्तरावर पारितोषिक प्राप्त झाल्याबद्दल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्गनगरी येथे मंत्री चव्हाण यांच्यावतीने हे पारितोषिक विद्यार्थ्यांना सुपुर्द करण्यात आले.

शासनाच्यावतीने महाराष्ट्र स्टुडंट्स इनोवेशन चॅलेंज या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत वैभववाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील दिपेश दळवी व मंदार परब या वीजतंत्री विभागातील विद्यार्थ्यांनी फिल्ड प्रोजेक्टर हा प्रकल्प केला होता.या प्रकल्पाला एक लाखांचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सहभागी दोन्ही विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.या प्रकल्पासाठी शिल्प निदेशक अमोल राणे व प्राचार्य नितीन पिंडकुरवार यांचं विशेष मार्गदर्शन लाभले.या विद्यार्थ्यांच सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.