
कणकवली : शहरातील चेतन पावर (वय - २५) बांधकरवाडी श्रीराम नगर येथे रहिवाशी असलेल्या एकाला व येथेच भाड्याने राहणाऱ्या सुनील चव्हाण याला अन्य तालुक्यातून काही इसमाने येत तीन गाड्या घेऊन येत दांड्याने व दगडाने मारहाण केली. यामध्ये त्या चेतन पवार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला ७ टाके पडले. आणि सुनील चव्हाण यांना किरकोळ मार लागला. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास जुना नरडवे रोड येथील दत्तकृपा निवारा शेड जवळ घडली. त्या ठिकाणी दुचाकी देखील होती त्याचे नुकसान त्या सात ते आठ जणांनी केले आहे. त्यामुळे अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचा वातावरण निर्माण झाले आहे.