बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी सोलापुर येथील दोघे ताब्यात...!

Edited by:
Published on: June 19, 2023 20:22 PM
views 134  views

सावंतवाडी : बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने सोलापुर येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दारू सह ११ लाख २ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई काल रात्री उशिरा सातोळी तिठा येथे करण्यात आली.

समाधान आनंद व्हनमाने वय 21 बिरुदेव उर्फ बीरुजानू खरात वय 24 हे दोघे राहणार सांगोला अशी त्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की यातील संशयित दोघे आपल्या ताब्यातील महेंद्रा बोलेरो पिकप घेऊन सावंतवाडीहून कोल्हापूरच्या दिशेने चालले होते यावेळी त्या ठिकाणी ड्युटी बजावत असलेले वाहतूक पोलीस प्रवीण सापळे यांना त्यांची हालचाल संशयास्पद दिसली यावेळी त्यांनी या दोघांना थांबून गाडीची तपासणी केली असता गाडीत मोठ्या प्रमाणावर दारू आढळून आले याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.