
कणकवली :पुण्याहून गोवा कडे जाणाऱ्या लक्झरीला महामार्गावर हळवल फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले आहेत. या अपघातात अन्य 30 जण जखमी झाले असून 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामध्ये लहान दोन मुलं आहेत ती सुदैवाने बचावली आहेत . जखमींवर कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय व खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. बस मध्ये एकूण 37 प्रवासी होते.या अपघातात शैलजा प्रेमानंद माजी (56 दोडामार्ग) व अण्णा गोविंद नाले (52 सातारा) अशी मृतांची नावे असल्याची माहिती पोलीस सूत्रानी दिली.पुण्याहून गोव्याकडे जाणारी सदरची लक्झरी गुरुवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हळवल फाटा येथे आली असता चालकाचा ताबा सुटून लक्झरी पलटी झाली यात या दोघाजणांचा मृत्यू झाला. अपघाताची खबर मिळताच स्थानिक नागरिक व कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे नगरसेवक संजय कामतेकर त्यांनी मदत कार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती बर्गे, पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील, किरण मेथे तसेच महामार्ग वाहतूक पोलीस राजेश ठाकूर, किशोर पाडावे, नंदकुमार रेडेकर यां कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना लागलीच उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचारही सुरू करण्यात आले असून त्यातील दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.