
चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील कामथे येथे रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कंटेंनरला आयशर टेम्पोची मागवून जोरदार धडक बसल्याने या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. या अपघातात ऋत्विक शिरोडकर, रामचंद्र शेणई अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे चिपळूण तालुकाध्यक्ष समीर काझी यांच्यासह शुभम कीलजे, अण्णा कुडाळकर, बंटी महाडिक, संतोष जावळे, सुदेश महाडिक, भाऊ लकेश्री, दशरथ खेडेकर, सार्थक महाडिक, शैलेश माटे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी गाव घेत आयशर टेम्पोमध्ये मृतावस्थेत अडकलेल्या दोघांना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढून कामथे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की आयशर टेम्पोच्या केबिनचा चक्काचुर झाला आहे.