लेखक संजय ढवळीकर यांची दोन पुस्तकं येतायत वाचकांच्या भेटीला

२७ डिसेंबरला प्रकाशन सोहळा ; उज्वला ढवळीकर यांच्या 'मनतरंग'चीही प्रतिक्षा
Edited by: विनायक गावस
Published on: December 22, 2025 21:47 PM
views 0  views

सिंधुदुर्ग : ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि माजी गोवा राज्य माहिती आयुक्त संजय ना. ढवळीकर यांच्या 'माणुसकीचा झरा' आणि 'जावे त्याच्या वंशा' या दोन पुस्तकांचे प्रकाशन पणजी गोवा येथे येत्या शनिवारी २७ डिसेंबर रोजी होत आहे. सौ. उज्वला सं. ढवळीकर यांच्या 'मनतरंग' या पुस्तकाचेही प्रकाशन यावेळी होणार आहे.


गोवा पणजीतील हॉटेल डेल्मॉन‌च्या सभागृहात शनिवारी संध्याकाळी ४.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे‌. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर, गोवा विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक डॉ. विनय बापट हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. पुस्तकांच्या प्रकाशनानंतर श्री. नितीन कोलवेकर आणि सौ. श्रुती हजारे अभिवाचन सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन 'शनि प्रकाशन'तर्फे करण्यात आले आहे.