राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हा कृषि सेलच्या वेंगुर्ला तालुकाध्यक्षपदी तुषार राय

Edited by: दिपेश परब
Published on: November 27, 2023 18:22 PM
views 151  views

वेंगुर्ला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट सिंधुदूर्ग जिल्हा कृषि सेलच्या वेंगुर्ला तालुकाध्यक्षपदी तुषार राय यांची नियुक्ती करण्यात आली.

वेंगुर्ले तालुक्यातील तुळस पलतडवाडी येथील तुषार राय हे  प्रगतशील शेतकरी असून गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी गाव, तालुका व जिल्हास्तरावर अनेक उपोषणे केली आहेत. तसेच शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना तळागळातील शेतकऱ्यांर्यंत पोहविण्याचे काम करत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चटणीस एम. के. गावडे यांच्या शिफारशीने  जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या हस्ते तुषार राय यांना वेंगुर्ला तालुका कृषिसेलचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश चटणीस एम के गावडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, जिल्हा उपाध्यक्ष बाबू सावंत, संदिप राणे, तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, जिल्हा सचिव सुशील चमणकर, शहर अध्यक्ष सुरज परब, उपाध्यक्ष स्वप्निल परब आदी उपस्थित होते.