तुषार हळदणकर यांची ग्रा.पं. विस्तार अधिकारीपदी पदोन्नती

Edited by: विनायक गांवस
Published on: April 09, 2025 19:26 PM
views 118  views

वेंगुर्ला : तालुक्यातील म्हापण येथील ग्राम अधिकारी तुषार काशिनाथ हळदणकर यांची पंचायत समिती देवगड येथे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पदी पदोन्नती झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. 

तुषार हळदणकर यांनी २००५ मध्ये ग्रामसेवक म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी केळुस, मेढा, चिपी, कुशेवाडा यानंतर ग्रामविकास अधिकारी म्हणून उभादांडा, मातोंड, पेंडुर, तुळस, कोचरा, वेतोरे व म्हापण आदी ठिकाणी यशस्वीपणे काम केले. दरम्यान आता त्यांना पंचायत समिती देवगड येथे विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे.