तीव्र उताराच्या वळणावर टेम्पो पलटी

Edited by: लवू परब
Published on: November 07, 2024 20:29 PM
views 196  views

दोडामार्ग : तिलारी घाटातील तीव्र उताराच्या वळणावर पडलेल्या ऑइल मुळे कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो घसरून पलटी झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

तिलारी घाटातील एका तीव्र उताराच्या वळणावर एका गाडीतून ऑईल पडले होते. या ऑईलमुळे अनेक दुचाकी घसरून पडल्या. शिवाय काही चारचाकी वाहने देखील घसरून अपघात झाले. चंदगड हून गोव्याच्या दिशेने ब्राॅयलर कोंबडी घेऊन जाणारा महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी घाटातील या वळणावर आली असता ती घसरली. परिणामी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व पलटी झाली. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. गाडीचेही मोठे नुकसान झाले. सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई व इतरांनी रस्त्यावर पडलेल्या ऑईलवर माती टाकली.