तुळसुली कर्याद नारूरला 'जिल्हा सुंदर गाव पुरस्कार'

आमदार निलेश राणेंकडून ग्रामस्थांचं कौतुक
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 01, 2025 10:58 AM
views 98  views

कुडाळ : ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारूर, ता. कुडाळ , जि. सिंधुदुर्ग या गावाला "जिल्हा सुंदर गाव पुरस्कार" मिळाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार मा. श्री. निलेशजी राणे साहेब यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी ग्रामविकासासाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. गावाच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करत, त्यांनी गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हा पुरस्कार मिळाल्यामुळे तुळसुली कर्याद नारूर हे एक स्वच्छ, सुंदर आणि आदर्श गाव म्हणून ओळखले जात आहे. याप्रसंगी शिवसेनेचे उपनते श्री. संजय आग्रे, जिल्हाप्रमुख श्री. संजू परब, श्री. संजय पडते, सौ. दिपलक्ष्मी पडते, श्री. दादा साईल, सरपंच नूतन आईर, उपसरपंच नागेश आईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारामुळे गावातील सामूहिक प्रयत्नांना मोठी ओळख मिळाली आहे.