
सावंतवाडी : आमची दिवाळी तुळशीचा लगीन लागासर असता. खयच्याय चेडवाच्या लगनाचो बोवाळ असता ना अगदी तसोच बोवाळ त्यादिवशी प्रत्येक घरात बघुक गावता. कोकणात तुळशीच्या लगनाचो माहोल कमालच असता. दिवाळी सपा सपाक तुळशीच्या लगनाची गडबड सुरू असता. ह्या लगीन कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत लावची रीत हा. जसा एखाद्या घरात चेडवाच्या लगनाची तयारी करतत ना तशीच मनापासून तुळशीच्या लगनाची तयारी सुरू असता. आदल्या दिवशीपासून घरातली माणसं तयारिक लागलेली असतत. तुळस धुवन घेतली जाता, खळ्यात शेण सारवन घेतला जाता. हा आता ता कोकणच्या घरांची ओळख असलेली खळी गायब झाली असली तरी काही घरांसमोर आजूनही आसत ह्या विशेष....
असो तो विषय आता नको. तर काही जण ह्या निमित्तानं तुळस रंगवन घेतत. लगनाच्या दिवशी तुळस नव्या नवरीसारखी सजयली जाता. तुळशीक मुलगी म्हणतत तर दिंड्याच्या काठीक नवरो म्हणतत. ही काठी कोरून तेच्यार नक्षीकाम केला जाता. तर मानग्याची काठी धेडो म्हणनं तुळशीत लायली जाता. झुपकेदार गोंडे लायलेलो ऊस ह्या सगळ्याची शोभा आणखीन वाढयता. तर घरातली बायका रांगोळीत हळद घालून कणों काढून चौथरो सजयतत. अशी आमची नवी नवरी नटान तयार होता. भटजींच्या मंत्रोच्चारात मगे एकदाचा शुभमंगल सावधान होता...लगीन लगल्यार जमलेल्यांका चिरमुरे वाटले जातत... प्रत्येक ठिकाणी थोड्याफार फरकान लगीन लावची पद्धत वेगळी बगुक गावता... मात्र ही मजा वेगळीच असता... काहींची नजर तुळशीत टाकलेल्या चिंचे आणि आवळ्यांवर. त्यात तुळशीचा लगना नंतर माणसांच्या लग्नाचे मुहूर्त सुरू होतत. तेच्यामुळे लग्नाळू का प्रश्न पडत असतलोच ना तुळशीचा झाला आता आमचा कधी ? ....