वेतोऱ्यातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत तुळस संघ विजेता

रायझिंग क्रिकेट मंडळ, वेतोरे यांचे सुंदर आयोजन
Edited by: दिपेश परब
Published on: March 06, 2024 09:03 AM
views 185  views

वेंगुर्ले : रायझिंग क्रिकेट मंडळ, वेतोरे यांच्या वतीने आयोजित व  उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेल्या एक गाव एक संघ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील तुळस संघ विजेता ठरला तर कुडाळ तालुक्यातील नेरुर संघाने उपविजेतेपद पटकावले. 


    येथील गोठण मैदान वरचीवाडी वेतोरे या ठिकाणी ३ ते ५ मार्च या दरम्यान ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मातब्बर असे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत मालिकावीर म्हणून गोट्या नाईक (तुळस), उत्कृष्ट फलंदाज म्हणून संकेत तुळसकर (तुळस), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून योगेश (तुळस), उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून किरण गावडे (नेरूर), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून शुभम गावडे (नेरुर) यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

   स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, विजय नाईक, संतोष कोंडसकर, गोट्या नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत समालोचक म्हणून सुमेध काळसेकर, शुभम सावंत, अनिकेत राऊळ यांनी काम पाहिले. तर राजू नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.