नारायण कुंभार यांच्या पाठपुराव्याने तुळस काजरमळी एसटी बस पुन्हा सुरू

Edited by: दिपेश परब
Published on: July 03, 2023 20:33 PM
views 201  views

वेंगुर्ला :  सावंतवाडी येथून वेंगुर्ला तुळस काजळमळी मार्गे संध्याकाळी ४.३० ते ५ वाजताच्या दरम्यान जाणारी एसटी बस पूर्ववत सुरू करण्यात यावी. अशी मागणी भाजप युवा मोर्चा तालुका सरचिटणीस तथा तुळस ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार यांनी आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यानुसार आजपासून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

ही एसटी बस फेरी बंद असल्याने शालेय मुलांच्या शैक्षणिक दृष्टीने नुकसान होत होते. त्यामुळे बाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी नारायण कुंभार यांनी केली होती यानुसार ही एसटी बस फेरी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. याबाबत नारायण कुंभार यांनी एसटी आगाराचे आभार मानले आहेत.