तुळस जैतीर उत्सव ६ जून पासून !

Edited by: दिपेश परब
Published on: May 10, 2024 05:55 AM
views 614  views

वेंगुर्ले : दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान, नराचा नारायण म्हणून प्रसिद्ध असलेले वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचे ग्रामदैवत श्री जैतीर देवाचा वार्षिक उत्सव दि. ६ जून पासून सुरू होत आहे. ११ दिवस चालणा-या या उत्सावाची सांगता १५ जून रोजी कवळासाने होणार आहे.

अत्यंत जागृत असलेल्या या देवाच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगाव, सिंधुदुर्ग व नजिकच्या गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. मुंबईतील चाकरमानी सुद्धा या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. तुळस गावसाहित पंचक्रोशीतील गावासाठी जैतीर उत्सव ही एक पर्वणीच असते.