त्सुनामी आयलंड पुनर्जीवित होणार !

निलेश राणेंचा पुढाकार : आयलंड 'सर्व्हे' चा निर्णय
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 12, 2023 15:22 PM
views 413  views

मालवण : देवबाग कर्ली खाडी पात्रातील त्सुनामी आयलंड गेल्या दोन वर्षापासून पाण्यात पूर्ण बुडून नष्ट होत चालले आहे. जल पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेले हे आयलंड पुनर्जीवीत व्हावे यासाठी येथील पर्यटन व्यवसायिकांनी माजी खासदार निलेश राणे यांचीही भेट घेऊन याबाबत लक्ष घालण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. 


पुणे येथील एका एजन्सी मार्फत त्सुनामी आयलंडचे सर्वेक्षण करून हे आयलंड पुन्हा अस्तित्वात येण्यासाठी उपाययोजनाचा अहवाल बनविण्याच्या सूचना निलेश राणे यांनी दिल्या. एजन्सी मार्फत आजच प्रत्यक्ष पाहणीअंती दोन दिवसात अहवाल तयार केला जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.


सर्व्हेअंती अहवाल तयार होताच  येत्या आठ दिवसात जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निलेश राणे यांच्या माध्यमातून त्सुनामी आयलंड प्रश्नी विशेष बैठक घेऊन त्सुनामी आयलंड सर्वेक्षण अहवाल सादर करून तातडीने उपाययोजना करण्याबाबत भूमिका मांडली जाणार आहे. 


एकूणच निलेश राणे यांनी त्सुनामी आयलंड प्रश्नी विशेष लक्ष दिले असून लवकरात लवकर त्सुनामी आयलंड पूर्वस्थितीत येण्यासाठी गतिमान हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबाबत ग्रामस्थ व व्यावसायिक यांनी समाधान व्यक्त केले आहे.