
वेंगुर्ला : गाडीअड्डा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वेंगुर्लाच्या सर्व कार्यकर्त्यांना सचिन वालावलकर यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर टीशर्टचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, सामाजिक कार्यकर्ते अमित म्हापणकर, शिवसेना शाखाप्रमुख समीर उर्फ पप्पु म्हापणकर, सचिन मांजरेकर, आबा केदार, मयु कुर्ले, प्रसाद मांजरेकर, राहुल सावंत, आकाश चव्हाण, गौरव माणगावकर, सतीश म्हापणकर, विनोद नाईक व समस्त गाडीअड्डा मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.