LIVE UPDATES

करूळात ट्रक पलटी

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 18, 2025 21:16 PM
views 173  views

कणकवली : समोरून येणाऱ्या आरामबसने हुल दिल्याने कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्याच्या बाहेर येऊन पलटी झाला. कणकवली - फोंडाघाट राज्य मार्गावरील करूळ येथील कारखाना थांब्यानजीक बुधवारी सकाळी ६ वा. सुमारास झालेल्या या अपघातात सुदैवाने कुणाला दुखापत झाली नसली तरी ट्रकचे बरेच नुकसान झाले.

ट्रक सिमेंटशी संबंधित एका द्रव्याची वाहतूक करत होता. अपघातानंतर विश्वजीत कर्णिक, कृष्णा निकम, राजेश निकम व स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला केबिनबाहेर काढले. अपघाताची सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली पोलीस ठाण्यात नोंद नव्हती