वळणावर गटारात कलंडला ट्रक

Edited by: लवू परब
Published on: May 22, 2025 15:58 PM
views 251  views

दोडामार्ग : दोडामार्ग - बांदा मार्गावर मणेरी येथे एका वळणावर मालवाहतूक करणारा ट्रक कलंडून अपघात घडला. मुसळधार पावसामुळे रस्ता निदर्शनास न आल्याने हा अपघात घडला. ट्रकच्या समोरील भागाचे किरकोळ नुकसान झाले.

बुधवारी मुसळधार पडणाऱ्या पावसाने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. वाहने चालवताना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने ही चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. असाच प्रकार मणेरी येथे घडल्याने मालवाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडला व अपघात घडला.