कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावर हळवल तिठा येथे राजस्थानहून गोव्याच्या दिशेने काच सामानाची मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार ट्रक महामार्गावर हळवल तिठा येथील तीव्र वळणावर आला असता समोर अचानक जंगली जनावरे आली. त्यामुळं ट्रक वरील चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला कोसळला. या अपघातात ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाली तर क्लीनर सही सलामत बचावला. मार्गावरील हळवल तिठा येथील अपघातांचे सत्र वारंवार सुरू आहे.