
मंडणगड : तायक्वाॅंडो फेडरेशन ऑफ इंडिया व तायक्वांडो असोसिएशन ऑफ गोवा यांच्या मान्यतेने तायक्वांडो अॕकॕडमी आॕफ वास्को यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या तिसऱ्या ओपन नॅशनल तायक्वाॕंडो चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता मंडणगड तालुका तायक्वाॅंडो खेळाडू ब्लॅक बेल्ट व राष्ट्रीय पंच तृशाली चव्हाण यांची निवड पंच म्हणून करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा पेडेम स्पोर्ट्स काॅम्पलेक्स इनडोअर स्टेडियम म्हापसा गोवा येथे दि.12 ते 15 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आहेत तृषाली चव्हाण यांची पंच म्हणून निवड रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनच्या शिफारशीने तिच्या खेळातील उत्तम अनुभव व कामगिरी नुसार करण्यात आलीं असून याबाबत तीचे अभिनंदन तायक्वाॕंंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष अविनाश बारगजे, सरचिटणीस मिलिंद पठारे, कोशाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी शैलेश गायकवाड, लक्ष्मण कररा, विश्वदास लोखंडे, शशांक घडशी, तालुका तायक्वाॅंडो अॕकॅडमीचे पदाधिकारी प्रशांत सुर्वे, आदेश मर्चंडे, काजल लोखंडे यांनी अभिनंदन केले.