
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड ही खेड तालुक्यातील एक मोठी संघटना असून प्राथमिक शिक्षकांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेते. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री माननीय योगेश दादा कदम हे असल्यामुळे प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहू असे प्रतिपादन माजी आमदार संजय राव कदम यांनी शिक्षक समिती शाखा खेडच्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावरून बोलताना केले यावेळी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती शशिकांत चव्हाण यांनी प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न माननीय नामदार योगेश दादा कदम यांच्या मार्गदर्शनाने सोडवले जातील असा विश्वास सभागृहाला दिला माजी बांधकाम सभापती अण्णा कदम यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आपले प्रश्न कधीही घेऊन या ते तातडीने सोडवले जातील असे सांगत त्रेवार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने खेड तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडचे त्रैवार्षिक अधिवेशन तालुकाध्यक्ष शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार संजयराव कदम माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती शशिकांत चव्हाण माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अरुण उर्फ अण्णा कदम जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे व जिल्हा नेते दिलीप महाडिक राज्य ऑडिटर अंकुश गोफणे खेडचे गटशिक्षणाधिकारी विजय बाईत पतपेढीचे माजी चेअरमन सुनील सावंत पतपेढीचे संचालक सुनील दळवी जिल्हा उपाध्यक्ष संजय सुर्वे जिल्हा कार्यकारणी सदस्य श्रीकृष्ण खांडेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश मंगल कार्यालय भरणे येथे संपन्न झाले.
यात्रेवार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली संतोष चव्हाण तालुकाध्यक्ष, धर्मपाल तांबे सचिव, अनिल यादव कार्याध्यक्ष, बबन साळवी उपाध्यक्ष, नवनीत घडशी कोषाध्यक्ष व सुनील पांगुळ कार्यालयीन चिटणीस यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा देण्यात आल्या. त्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने आदर्श शाळा आदर्श शिक्षक विविध पुरस्कार प्राप्त शिक्षक रत्नागिरी टॅलेंट सर्च, नवोदय विद्यालय यशस्वी विद्यार्थी, इस्त्रो व नासा या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी निवृत्त शिक्षक आदींचा सत्कार करण्यात आला. ह्या त्रैवार्षिक अधिवेशनाला शिक्षक बंधू-भगिनींचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला विशेषतः नवीन शिक्षण सेवकांनी या त्रैवार्षिक अधिवेशनाला उपस्थिती दर्शवली या अधिवेशनाला सुमारे 300 शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील दळवी यांनी केले सूत्रसंचालन संतोष चव्हाण व दीपक कांबळे यांनी केले तर आभार अनिल मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष शरद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मपाल तांबे बबन साळवी अनिल यादव संतोष चव्हाण संतोष यादव नेत्रदीप तांबे प्रसिद्धी प्रमुख शैलेश पराडकर दिलीप यादव संतोष मोरे संतोष बर्वे नारायण शिरकर नवनीत घडशी बबन मोरे दत्ताराम चव्हाण भागोजी काताळे भारत घुटूकडे संजय गडाळे प्रमोद कदम अमर चव्हाण गजानन पालांडे अनंत मोरेअनिल मोरे भाऊसाहेब कांबळेनिलेश कांदेकर महेंद्र शिंदे राजाराम दरेकर भागोजी कडव स्वाती यादव सुविधा सावंत नम्रता चाळके दीप्ती यादव स्नेहल यादव अर्चना पालकर कल्याणी कासार विद्या घडशी सुजाता चाळके भगवती उतेकर पुनम दळवी अश्विनी भंडारी पेंडखळकर मॅडम किरण जानकर आदींनी मेहनत घेतली.