LIVE UPDATES

वेंगुर्लेत भर पावसात तिरंगा रॅली यशस्वी

Edited by: दिपेश परब
Published on: May 21, 2025 20:12 PM
views 28  views

वेंगुर्ले : काश्मीरमध्ये निष्पाप भारतीय नागरिकांची हत्या करणारे दहशतवादी आणि त्यांना पोसणारा पाकिस्तान यांना जबरदस्त तडाखा देणार्‍या भारतीय सैन्यबलांचे अभिनंदन करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंगळवारी २० मे रोजी सायंकाळी वेंगुर्ला शहरात 'ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅली' मोठ्या उत्साहात संपन्न केली. उपस्थित नागरिकांनी भर पावसात रॅली काढली. 

या रॅलीत वेंगुर्ला तालुक्यातील व परिसरातील बंधूभगिनी जाती, धर्म व पक्षीय भेदाभेद विसरून एकजुटीने केवळ भारतीय म्हणून हाती तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. 

"भारत माता की जय, वंदे मातरम,हम सेना के साथ है, ऑपेरेशन सिंदूर के साथ है अशा घोषणा देत रॅली उत्साहात भर पावसात मोठ्या उत्साहात वेंगुर्ला दाभोली नाका ते रामेश्वर मंदिर करत परत दाभोली नाका येथे समारोप झाला.भारतावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले तेव्हा सीमेवरील सैनिकांच्या पाठीशी देशातील प्रत्येक नागरिक उभा राहिला आहे. यापुढेही आपण हीच एकजूट कायम ठेवावी असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.