राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्यावतीने बाबासाहेबांना अभिवादन

Edited by: विनायक गांवस
Published on: April 14, 2026 14:20 PM
views 44  views

सावंतवाडी : राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्यावतीने  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेच पूजन करून अभिवादन करण्यात आले. यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले.

याप्रसंगी मंडळाचे सल्लागार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष विजय पवार, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव, संजय साळगावकर, ड्यूमिंग अल्मेडा,लाडू जाधव, लक्ष्मण कदम, रवी जाधव आदी  उपस्थित होते.