
आंबोली येथील शौर्यचक्र प्राप्त शहिद पांडुरंग गावडे यांना आज आजी-माजी सैनिकांनी आदरांजली वाहिली. आंबोली मुळवंदवाडी येथील सैनिक पांडुरंग गावडे जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना बॉम्ब शेल्टर लागून शहीद झाले होते. आज त्यांच्या ७ व्या स्मृती दिनी शहिद पांडुरंग गावडे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी आंबोली येथील आजी-माजी सैनिकांनी आदरांजली वाहिली. उपस्थितांनी मानवंदना देत श्रद्धांजली वाहत देशाप्रती आणि सैनिकांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी शाहिद जवानाचे आई वडील तसेच कुटुंबीय, जिल्हा सैनिक कल्याण सहाय्यक अधिकारी श्रीधर गावडे, हवालदार संजय गावडे, कॅप्टन शंकर गावडे, सुभेदार नामदेव पारधी, ऑनररी कॅप्टन धोंडी बाबाजी गावडे, हवालदार मनोहर राऊत, हवालदार राजाराम गावडे, कॅप्टन शांताराम गावडे, सैनिक स्कूल माजी प्राचार्य सुरेश गावडे, सुभेदार दशरथ पारधी, तुकाराम नाटकर, आप्पा गावडे, हवालदार गणपत गावडे, नायक शिवाजी परब, हवालदार अनिल नाटलेकर, ऑनररी कॅप्टन शांताराम गावडे, लक्ष्मण पारधी, विजय गुरव, विजय जाधव,नारायण पारधी, कृष्णा सावंत, चंद्रकांत राऊत, राजेश गावडे, जाणू पाटील, कल्पना झेंडे, स्वप्नीता कर्पे, शिवनाथ कोरगावकर, दीपक भिसे, कल्पेश परब, तसेच शाळेतील दहावीचे वर्गमित्र, आजी माजी सैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.