उत्कृष्ट कामगिरीबद्दल सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचा सन्मान...!

Edited by: विनायक गावस
Published on: August 02, 2023 14:30 PM
views 155  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल दिनाचा १ ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला असून पुढील सात दिवस "महसूल सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त महसूल विभागामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरविण्यात येते. सिंधुदुर्गनगरी येथे महसूल दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याहस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचा सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केलेल्या कामाची दखल घेत जिल्हा प्रशासनानं हा गौरव केला.