वैभववाडीत शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांना मानवंदना...!

Edited by:
Published on: August 07, 2023 19:11 PM
views 267  views

वैभववाडी : शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांचा ५ वा स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तालुक्यातील शासकीय कार्यालयासह विद्यार्थ्यांमध्ये मेजर रावराणे यांना अभिवादन करण्यात आले.

जम्मू काश्मीर येथे सन २०१८ मध्ये दहशतवाद्यांशी लढताना वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र मेजर कौस्तुभ रावराणे यांना वीरमरण आले होते.शहीद कै.रावराणेंचा यांच्या ५व्या स्मृती दिनानिमित्त तालुक्यात आदरांजली वाहण्यात आली.यानिमित्ताने येथील आनंदीबाई रावराणे विद्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यामध्ये २२रक्तदात्यांनी रक्तदान केले.महाविद्यालयाच्यावतीने आयोजित केलेल्या मानवंदना कार्यक्रमात विद्यार्थी व प्राध्यापक यांनी  शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांचा जीवन प्रवास मांडला.या स्मृती दिनानिमित्त शहीद मेजर कौस्तुभ रावराणे मित्रमंडळ यांच्यावतीने तालुक्यातील सरकारी कार्यालये,शाळा,महाविद्यालयांना शहीद कौस्तुभ रावराणे यांची प्रतिमा भेट देण्यात आली.सर्व कार्यालयांमध्ये या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.सडुरे येथील मुळ गावी विजय रावराणे यांनी कौस्तुभ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.