कृषि दिनाच्या औचित्याने वृक्ष लागवड अभियानास सुरवात

Edited by:
Published on: July 01, 2024 14:01 PM
views 73  views

सिंधुदुर्ग : कृषि विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषि विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय, किर्लोस यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड अभियानास सुरुवात करण्यात आली. या अभियानाचा शुभारंभ जेष्ठ पत्रकार संजय वालावलकर यांचे शुभ हस्ते वृक्षरोपण करून करण्यात आली. केंद्रातर्फे १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग मध्ये वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येणार असून या हंगामात१५ हजार झाडे लावण्याचे  उदिष्ट ठेवण्यात आले आहे.  कृषि दिनाच्या दिवशी या अभियानाला सुरुवात करण्यात आली. सर्व प्रथम महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून १५ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला. या अभियानाचे प्रायोजक वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग असून त्यांचे द्वारे रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

जेष्ठ पत्रकार संजय वालावलकर यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व धरणी मातेचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे असे ते म्हणाले. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे व कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर यांचे शुभहस्ते झाडे लावण्यात आली. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत,         प्रा. महेश परूळेकर, प्रा. आनंद सावंत, प्रा. मंगेश रासम, प्रा. विवेक राणे, प्रा. गोपाळ गायकी, प्रा. भावना पाताडे, प्रा. वर्षा गोसावी, कॉलेजचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुनील जाधव यांनी केले.