
सावंतवाडी : नगरपरिषदेमार्फत मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अंतर्गत वसुधा वंदन हा कार्यक्रम माठेवाडा मदारी रोड येथे घेण्यात आला. ह्यावेळी खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे प्रमुख उपस्थितीती होती.
तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आनंद नेवगी, उत्कर्षा सासोलकर, दिपाली भालेकर, भारती मोरे, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, विनोद सावंत, भाऊ भिसे, गजानन परब, आसावरी शिरोडकर, देवीदास आडारकर, परवीन शेख आदी नगरपरिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.