
तळेरे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक पेड मा के नाम अभियानाअंतर्गत तळेरे स्मशानभूमी परिसरात वृक्षप्रेमींनी वृक्षारोपण केले.
यावेळी सरपंच हनुमंत तळेकर, ग्रामसेविका राजलक्ष्मी जाधव, प्रशांत वरवडेकर, ग्रा. पं. सदस्य संदीप घाडी, शैलेश सुर्वे, तळेरे व्यापारी संघटना अध्यक्ष दशरथ कल्याणकर, माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, प्रवीण वरुणकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, माजी उपसरपंच दिनेश मुद्रस , शशांक तळेकर, चंद्रकांत जठार, सुयोग तळेकर, चिन्मय तळेकर, अनुप तळेकर ,पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, डॉ. किरण पवार, सामाजिक वनीकरण कणकवली परिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी, तळेरे आरोग्य उपकेंद्राच्या परिचारिका सुचिता तळेकर, आशा सेविका सान्वी तळेकर, अंगणवाडी सेविका नेहा वांयगणकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.