नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने नाधवडेत वृक्षारोपण

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 08, 2025 21:55 PM
views 21  views

वैभववाडी : नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्य स्मरणार्थ प्रतिष्ठाच्यावतीने नाधवडे येथील अरविंद सावंत माध्यमिक विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रशालेच्या परिसरात १००झाडे लावण्यात आली. या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारीही प्रतिष्ठानच्या सदस्यांनी घेतली आहे.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने आज (ता.८)नाधवडे येथील अरविंद सावंत माध्यमिक विद्यालयात वृक्षांची लागवड करण्यात आली. विविध प्रकारची १०० झाडे लावण्यात आली. यामध्ये आवळा, काचंन, शिवण, जांभुळ, बहावा १०, करंज २० या झाडांचा समावेश आहे. या उपक्रमात धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या शेकडो सदस्यांनी सहभाग घेतला. याशिवाय विद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षकांनी देखील सहभाग घेतला. लागवड केलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी देखील प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्विकारली असुन पुढील देखभाल सदस्य करणार आहेत. या उपक्रमाचे नाधवडेतून कौतुक केले जात आहे.