आ. शेखर निकमांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण

उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Edited by: मनोज पवार
Published on: July 23, 2025 17:28 PM
views 94  views

चिपळूण :  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांचेकडून शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला.   

आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले.  तसेच त्यांच्या  प्रेरणेतून महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांकडूनही वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार शेखर निकम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास बोईसर विधानसभा  मतदार संघाचे माजी आमदार राजेश पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांसह विद्यार्थ्यांकडून फळे,फुले तसेच शोभिवंत झाडांचे रोपण करण्यात आले. महाविद्यालयातील उपस्थित विषयतज्ज्ञांकडुन रोपण केलेल्या झाडांचे फायदे तसेच लागवड पद्धती, नर्सरी व्यवस्थापन यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यी उपस्थित होते.