
कणकवली : स्वातंत्र्यदिनानिमित्त कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, डॉ. महादेव उबाळे, वैभव फाले, परशुराम आलव, श्री. देवलेकर, अशोक नारकर, विजय चौरे, डॉ. अंकित उपाध्याय, श्री. कुंभार, पत्रकार तुषार हजारे, मयुर ठाकूर यांच्यासह डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
परिसरात सुपारी, नारळ, चिकू, चाफा यासह अन्य औषधी वृक्षांचे रोपण करण्यात आले. निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून नागरिकांनी वृक्षारोपण करून त्या वृक्षाचे संगोपन करावे, असे आवाहन डॉ. विशाल रेड्डी यांनी केले.