
कणकवली : कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांची सागरी सुरक्षा विभाग येथे तातडीने बदली करण्यात आली आहे. 30 डिसेंबर ला त जिल्हा पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी कणकवली पोलिस स्थानकात भेट दिली होती. आणि त्यानंतर 31 तारखेला लगेचच त्यांच्या बदलीचे आदेश आले. त्यामुळे चर्चेला उदाहरण आलं आहे. हुंदळेकर यांच्या जागी सागरी सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अचानक बदलीचे कारण समजू शकलेले नाही. सचिन हुंदळेकर यांनी कणकवली पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर तालुक्यातील कायदा, सुव्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी नेहमीच प्रयत्न केले. विशेषतः दिवसा अथवा रात्रीही घडलेल्या अपघात व तत्सम घटनांप्रसंगी ते घटनास्थळी जातीने पोहोचत. तसेच कणकवली तालुका हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुका आहे. येथे गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे बदल्यात पोलिसांनाचे मनुष्यबळ कमी असून देखील त्यांनी कणकवली पोलीस स्थानकात उत्कृष्ट्या काम केले होते. त्यामुळे अचानक त्यांच्या या झालेल्या बदलीमुळे चर्चेला उधाण आला आहे