सावंतवाडी रेल्वे स्थानकासाठी रत्नसिंधूमधून निधी देणार : मंत्री दीपक केसरकर

Edited by: विनायक गावस
Published on: October 10, 2023 13:59 PM
views 250  views

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबल्या पाहिजेत यासाठी आपण आग्रही आहे. तसेच सावंतवाडी टर्मिनस देखील झाले पाहिजे. कोकण रेल्वेकडे निधी नसेल तर रत्नसिंधू योजनेतून उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.

खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे स्वप्न निधी अभावी धुसर झाले अशा प्रकारे केलेले वक्तव्य दुदैवी आहे. रखडलेले काम मार्गी लागण्यासाठी सिंधुरत्न मधून मी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देईन त्याच बरोबर वंदे भारतसह अन्य गाड्या थांबविण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे आपण मागणी केली आहे अशी माहीती शालेश शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली. खासदार राऊत यांनी सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी रेल्वेकडे निधी नाही. त्यामुळे हा प्रकल्प होण्याची शक्यता धुसर बनली आहे अशी भिती व्यक्त केली होती. याबाबत दीपक केसरकर यांना विचारले असता वंदे भारत ट्रेन सोबत अन्य महत्वाच्या गाड्या थांबविण्यासाठी मी केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे मागणी केली आहे. तर टर्मिनसचे स्वप्न धुसर होणार असे वक्तव्य त्यांनी करणे चुकीचे आहे. काही झाले तरी ते काम पुर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी मी सिंधुरत्न योजनेतून उपलब्ध करून देणार आहे असे त्यांनी सांगितले. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सुविधा व रेल्वे गाड्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे असे त्यांनी सांगितले.