
कणकवली : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली येथे अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) ट्रेनिंग अँड लर्निंग अकॅडमी (ATAL), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने, कंप्युटर सायन्स आणि इंजिनिरिंग (AIML) विभागात दिनांक 20 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत “Principles, techniques and perspective on optimization techniques in engineering and future trends” या विषयावर प्राध्यापक आणि अध्यापक यांच्यासाठी साप्ताहिक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव चे प्राध्यापक डॉ. अशोक जी मतानी यांच्या हस्ते 20 जानेवारी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, संस्थाध्यक्ष सौ. नीलम राणे, उपाध्यक्ष आमदार नितेश राणे, सचिव तसेच आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती आहे. या कार्यशाळेसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. दुरादुंडी सावंत.बाडकर यांनी अर्ज केला होता. कार्यशाळेसाठी अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेच्या ट्रेनिंग अँड लर्निंग अकॅडमी, नवी दिल्ली यांनी आर्थिक सहाय्य केले आहे.
या कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. दुरादुंडी सावंत.बाडकर आणि कंप्युटर सायन्स आणि इंजिनिरिंग (AIML) विभागाचे प्रमुख प्रा. सुप्रिया नलावडे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. सदर कार्यशाळेत देशातील नामवंत विद्यापीठातील आणि एनआयटी, आयआयटी सारख्या नामवंत संस्थांतील प्राध्यापक व्याख्यानमालेत सहभाग नोंदवणार आहेत.