
बांदा : बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने १५ वा वित्त आयोग अंतर्गत पर्यावरणपूरक कापडी पिशव्या तयार करणे, मसाले निर्मिती व फॅशन डिझायनिंग ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महिलांनी सुंदर व आकर्षक पिशव्या बनविल्या.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामपंचायत बांदा यांचे वतीने देणेत येणार असलेने पूर्णपणे मोफत आहेत. प्रशिक्षण २१ डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत देण्यात येणार आहे. यावेळी सरपंच अक्रम खान, दिलीप बांदेकर, दीपाली बांदेकर, प्रशिक्षक प्रकाश पाटील यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
बांदा गावातील सर्व युवती व महिलांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बांदा ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.