
सिंधुदुर्गनगरी : शासनाचे महत्वाकांक्षी 100 दिवस कार्यक्रमांतर्गत सेवेत नव्याने दाखल कर्मचाऱ्यांकरीता प्रशिक्षण देण्याबाबत सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे एकूण 150 कर्मचाऱ्यांना दि.21 मार्च व 24 मार्च 2025 या दोन दिवशी प्रत्येकी 75 कर्मचाऱ्यांची एक तुकडी प्रमाणे एक दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) किशोर काळे यांनी दिली आहे.
या प्रशिक्षणामध्ये सेवाविषयक बाबी आणि कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञान वापर AI या विषयावर प्रशिक्षण होणार आहे. त्यानुसार पहिल्या तुकडीचे उध्दाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सिंधुदुर्ग येथे करण्यात आले.
कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) किशोर काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) विशाल तनपुरे, यांनी प्रशिक्षण दिले. त्यानंतर कार्यालयीन कामकाज व झीरो पेन्डसी व ई- ऑफिस या विषयावर, सामान्य प्रशासन विभाग, सहा. प्रशासन अधिकारी दत्ता गायकवाड व प्रोजेक्ट लीड ऑफिसर शंकर बगाड, यांनी पहिल्या सत्रात प्रशिक्षण झाले. तसेच दुपारनंतरच्या सत्रात टिप्पणी, पत्रलेखन व माहितीचा अधिकार व सहा गड्ढे पद्धती व अभिलेख वर्गीकरण या विषयावर सामान्य प्रशासन विभाग, सहा. प्रशासन अधिकारी दत्ता गायकवाड दत्ता गायकवाड, व शिस्त अपिल नियम 1964 व सभा कामकाज या विषयावर सहा. प्रशासन अधिकारी जगदीश राणे व लेखा विषयक कामकाजाची थोडक्यात माहिती या विषयावर सहा. लेखाधिकारी आनंद गोसावी यांचे प्रशिक्षण झाले. तसेच दि. 24 मार्च 2025 रोजी दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण होणार होणार आहेत.