![](https://kokansadlive.com/uploads/article/17254_pic_20250215.1247.jpg)
दापोली : दापोली तालुका व्यापारी संघटना व जालगाव पंचक्रोशी व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अन्न भेसळ प्रमाणपत्र जागरूकता प्रशिक्षण कार्यशाळेचे नुकतेच जालगाव येथील श्री प्रीतिवर्धन मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी दापोली तालुक्यातून १९८ अन्नभेसळ प्रमाणपत्र धारक व्यापारी उपस्थित होते. विजय पाचपुते अन्नभेसळ निरीक्षक रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेमध्ये अन्न भेसळ प्रक्रिया अंतर्गत फॉसकॉसचे प्रशिक्षण सोनल पानमंड मुंबई यांनी दृक श्राव्य माध्यमातून दिले. या प्रशिक्षणासाठी जालगांव, दापोली, दाभोळ, बुरोंडी, हर्णै, पालगड, कुंभवे, वाकवली, गावतळे अशा अनेक गावांमधून दुकानदार, व्यापाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी समन्वयक समिती प्रमुख मिलींद शेठ, प्रशांत परांजपे, जालगाव व्यापारी संघटना अध्यक्ष समीर फाटक, सचिव महेंद्र शेठ, खजिनदार अण्णा साबळे,विनोद आवळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य मयुरेश फाटक व कौस्तुभ जोशी, प्रसाद करमरकर, केतन आपटे, अजय करमरकर, युवराज पेठे, सुजय मेहता आदींनी प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. तसेच 25 मे रोजी होणाऱ्या व्यापारी संघाच्या मेळाव्यासाठी दापोलीतील सर्व व्यापारी, दुकानदारांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन दापोली तालुका व्यापारी संघटनेकडून करण्यात आले आहे. सुत्रासंचालन व आभार प्रदर्शन विनोद आवळे यांनी केले. भोजनोत्तर कार्यशाळेची सांगता झाली.