
मंडणगड : ग्रामिण भागातील महिलांचे आरोग्याकरिता घराडी येथील स्नेहज्योती अंधविद्यालयाने पुढाकार घेतला असून जागतीक आरोग्य संघटनेने जिनीव्हा येथे गौरविलेल्या पॅड वूमन सौ. स्वाती बेडेकर यांनी आपल्या सहकार्यांसमवेत 6 7 व 8 ऑक्टोंबर 2024 रोजी विद्यालयातील अंध विद्यार्थीनींना सँनीटरी पँड बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घराडीसारख्या ग्रामिण भागात सुरु झालेला हा प्रकल्प कोकणातील ग्रामिण भागातील महिला व मुलिंच्या स्वच्छता व आरोग्य विषयक समस्यांवर भविष्यात उत्तम उपाय ठरणार आहे.
स्नेहज्योती अंध विद्यालयाचे माध्यमातून उत्तम दर्जाचे व जागतीक मान्यता प्राप्त असलेले सँनिटरी पँड निर्मीतीचा प्रकल्पाचा विद्यालयात शुभारंभ झाला त्यासाठी आवश्यक मशनरी विद्यालयात या आधीच बसवण्यात आली आहे 6 7 व 8 ऑक्टोंबर 2024 रोजी पँड बनवण्यासाठीची आवश्यक असलेल्या व विद्यालयात बसवण्यात आलेल्या मशनरीची टेस्टीग करण्यात आली व या निमीत्ताने महिलांशी संवाद साधून प्रशिक्षणही देण्यात आले. प्रकल्प पुर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर यातून विद्यालयातील अंध विद्यार्थीनी व परिसरातील महिलांना रोजगाराच्या खुप मोठ्या संधी उपलब्घ होणार आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी घराडी येथे ना नफा तोटा या भावानेने समाजाच्या सेवेत रुजू होणाऱ्या या प्रकल्पास चालना दिली असून आपल्या आई रजनी तेंडुलकर यांच्या नावे या प्रकल्पास देणगी रुपाने अर्थसहाय्य केले असून पँड वुमन स्वाती बेडेकर यांनी प्रकल्पासाठी लागणारी मशनरी रॉ मटेरीयल तांत्रीक माहीती व प्रशिक्षण पुरवले आहे.
या प्रकल्पामुळे रोजगार निर्मीतीसह आरोग्य रक्षणासाठी कोकणातील ग्रामिण व दुर्गम भागात विधायक व मोठे काम उभे राहू पहात आहे. यशस्नेहा ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. आशा कामत सर्व संचालक विद्यालयाच्या प्राचार्या प्रतिभा सेनगुप्ता व विद्यालयाचे सर्व कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.