भुईबावडा घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळित...!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 31, 2023 11:28 AM
views 113  views

वैभववाडी : तालुक्यातील भुईबावडा घाटात आज सायंकाळी दरड कोसळली.यामुळे घाटातील विस्कळित झाली होती.अखेर जेसीबीच्या साह्याने दरड हटवून मार्ग सुरळीत करण्यात आला.

तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे.मात्र भुईबावडा घाटात आज (ता.३०)सायंकाळी ४ व्या दरम्यान घाटात दरड कोसळली.यामुळे भुईबावडाहून गगनबावड्याला जाणारी वाहतूक तासभर ठप्प झाली होती.अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या साह्याने दरड हटवून मार्ग सुरळीत केला.शुक्रवार सायंकाळपासून गगनबावडा- कोल्हापूर वाहतूक सुरू आहे.यामुळे भुईबावडा घाटात आज वाहतूक देखील वाढली होती.मात्र सायंकाळी दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती ‌.सायंकाळी उशिरा दरड हटवून मार्ग खुला करण्यात आला.