
मालवण : मालवण चिवला बीच येथे पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर इचलकरंजी येथील चार तरुणांच्या पर्यटन ग्रुपने भल्या पहाटे चिवला बीच येथील मच्छिमारांचे मासे चोरल्याची घटना घडली आहे. मच्छिमारांना याबाबत माहिती मिळताच पर्यटक राहत असलेल्या हॉटेल मध्ये जाऊन खात्री करण्यात आली. त्यावेळी चोरी झालेले मासे सापडून आले. पर्यटकांनी माफी मागण्यास सुरवात केली. मात्र चोरी करणाऱ्या त्या पर्यटकांना स्थानिकांनी मालवणी हिसका दिला. त्यानंतर त्या पर्यटकांनी माफी मागत मासळीची होणारी किंमत मच्छिमारांना सुपूर्द केली.
रात्री मच्छिमारांनी समुद्रातून पकडून आणलेले मासे नेहमीप्रमाणे किनाऱ्यावर असलेल्या कावनात (मच्छिमार झोपड्यात) बर्फात घालून सुरक्षित ठेवले होते. त्याची चोरी करण्यात आली. सुरमई वगरे किंमती मासे यात होते. अशी माहिती मिळाली आहे.