
दोडामार्ग : दोडामार्ग ते विजघर मार्गावर गेल्या काही दिवसात अपघाताच सञ सुरूच आहे. कर्नाटक येथील पर्यटक गोवा येथून पुन्हा बेळगाव येथे जात असताना बुधवारी पहाटेच्या सुमारास कार चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडला. मात्र कोणतीही जीवित हानी घडली नाही. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गोवा येथे पर्यटनासाठी आलेले कर्नाटक येथील काही पर्यटक बेळगांवला जात होते. पाळये येथे पोहचले असता कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार बाजूच्या गटारात गेल्याने अपघात घडला, त्या ठिकाणी असलेल्या नागरीकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढले. किरकोळ दुखापत वर मलमपट्टी केली. पण कारचे मोठे नुकसान झाले आहे.