
सावंतवाडी : येथील पर्यटन तज्ज्ञ, एक अभ्यासू व्यक्तीमत्व डी.के. सावंत यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले. मुंबई येथे त्यांच देहदान करण्यात येणार आहे. डी.के. सावंत यांनी पर्यटन क्षेत्रात भरीव योगदान दिले होते. समाजासाठी लढवणारे, सुजाण नागरिक व आदर्श व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. रेल्वे आंदोलन, पर्यटन वृद्धीसह भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असत. त्यांच्या निधनाने पर्यटन क्षेत्रात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.