
वैभववाडी : श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्ट सांगुळवाडी यांच्यावतीने येथील दत्त मठात दत्त जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील दत्त मठात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याहीवर्षी हा उत्सव साजरा होत आहे. मागील दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. आज दि. ७ रोजी दत्त जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी सकाळी ८.३० वा पूजापाठ, १०.३० ला दत्त याग होमहवन, दुपारी १.२० वा महाआरती, १.३० महाप्रसाद, सायंकाळी ५.१५ वा. दत्तजन्म व्याख्यान, ६.१५ वा. दत्त जन्म उत्सव, रात्री ८.३० महाआरती, रात्री ९ वा. पालखी मिरवणूक, १० वा. डबलबारी भजन होणार आहे.
बुवा राहुल कुलकर्णी विरुद्ध विनय नांदोस्कर यांचा २०-२० भजनाचा सामना रंगणार आहे. तरी भाविकांनी दत्तजयंती उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्ट, सांगुळवाडी यांनी केले आहे.