
सावंतवाडी : शहरातील माठेवाडा अंगणवाडी क्रमांक १५ मधील चिमुकल्यांनी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. बालकांनी पारंपरिक सणाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्यक्ष दहीहंडी फोडण्याचा थरार अनुभवला.
यावेळी चिमुकला गीतांश मुंज कृष्ण बनला होता, तर समर्थ नेवगी, समर्थ काष्टे आणि मिहान मडगावकर यांनी त्याचे सवंगडी म्हणून भूमिका साकारली. प्रिशा देशमुख, दुर्वा गावडे, योगिता पाटील, शुभांगी मेस्त्री, सावी नेवगी, प्रियांशी गुप्ता, सृष्टी कावडे आणि शब्दाली कदम या चिमुकल्यांनी राधेची वेशभूषा केली होती. या गोपाळकाला उत्सवात गंधार नाईक, अरहान शेख, आर्या शर्मा, कबीर परब, वरद गावडे, लकी शर्मा, दुर्वांश जाधव, स्वराज गोरे, अथांग मातोंडकर, गोरक्ष नाईक, नितीन चव्हाण आणि विजय चव्हाण यांनी कृष्णाचे सवंगडी बनून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, मदतनीस अमिषा सासोलकर उपस्थित होत्या. तसेच, जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ च्या मुख्याध्यापिका भक्ती फाले, सहायक शिक्षिका प्राची ढवळ, पूजा ठाकूर, भावना गावडे, हेमांगी जाधव आणि शिक्षक रणजीत सावंत यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालकांमुळे कार्यक्रमाला अधिकच रंगत आली. तीन वर्षांच्या या चिमुकल्यांनी दहीहंडीचा हा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.