गद्दारांना धडा शिकवायचा, कामाला लागा : खा. विनायक राऊत

Edited by: विनायक गावस
Published on: January 15, 2024 06:12 AM
views 181  views

सावंतवाडी : गद्दारांना धडा शिकवायचा आहे. त्यासाठी कामाला लागा, १५ फेब्रुवारी पर्यंत आचारसंहिता लागणार अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना केल्या. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आढावा घेतला यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या बैठकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख शैलेश परब जिल्हाप्रमुख संजय पडते जिल्हा समन्वयक बाळा गावडे अतुल रावराणे युवा सेना जिल्हाधिकारी मंदार शिरसाट सावंतवाडी तालुका संपर्कप्रमुख राजू नाईक, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, यशवंत परब संजय गवस दोडामार्ग वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्यातील महिला पदाधिकारी आदीसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार राऊत म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ही जागा जिंकायची आहे. त्यामुळे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून आपण पाच वर्षात केलेले काम पटवून सांगा. काहीजण निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून खोटी आश्वासन देतील. त्यामुळे अशा भूलथापांना बळी न पडता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन तुम्ही जनतेला करा अशा सूचना देखील विनायक राऊत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.

सावंतवाडी येथील हॉटेल शिल्पग्राममध्ये झालेल्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक प्रश्न उपस्थित केले. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाणार असून कोणत्याही परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी शिवसैनिकानी एकजुटीने कामाला लागा असे आवाहन खासदार राऊत यांनी केले.