सावंतवाडीत तिरंगा यात्रा

Edited by: विनायक गांवस
Published on: May 20, 2025 14:07 PM
views 210  views

सावंतवाडी : पहलगाम हल्ल्याचा पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील गांधी चौक येथे उद्या संध्याकाळी ठीक ४.०० वाजता तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यात सर्वपक्षीय, सामाजिक संस्था, व्यावसायिक असोसिएशन, विविध मंडळ आणि तमाम सुज्ञ जनतेन सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या क्रूर अतिरेक्यानी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय पर्यटकांचे नाहक बळी गेले.आपल्या देशाच्या कर्तबगार तिन्हीही सुरक्षा दलानी ऑपेरेशन सिंदूर सारख्या धारदार हत्याराने पाकिस्तानी दुष्क्रूत्याला चोख प्रत्युतर देऊन चारी मुंड्या चित करून टाकलं व है सगळ्या जगानं बघितलं आहे. भारतीय तिन्हीही सैन्यदलाचे मनोबल वृद्धिंगत करणं आणि त्यांचा जाज्वल्य अभिमान व गौरव दृढतर करणं हे प्रत्येक स्वाभिमानी भारतीय नागरिकांच आध्य कर्तव्य आहे.

त्याचंच औचित्य साधून बुधवारी  २१ मे २०२५ रोजी सावंतवाडी शहरातील गांधी चौक भारत माता हॉटेल येथून संध्याकाळी ठीक ४.०० वाजता सर्व पक्षीय, सामाजिक संस्था, व्यावसायिक असोसिएशन, विविध मंडळ आणि तमाम सुज्ञ जनतेच्या वतीने तिरंगा यात्रा आयोजित केलेली आहे. यात आपले सहकारी, हितचिंतक व मित्रमंडळी यांच्या सहित उपस्थित राहून उपक्रमात सक्रिय सहभागी होऊन उपकृत करावे असे आवाहन महेश सारंग यांनी केले आहे.