तिलारीत डबल डेकर हाऊसबोट पर्यटन येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार

मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा
Edited by:
Published on: March 10, 2024 13:39 PM
views 106  views

दोडामार्ग : येत्या पावसाळ्यात पूर्वी तिलारीत प्रस्तावित असलेला डबल डेकर बोट प्रकल्प आणि पर्यटन प्रकल्प मार्गी लागेल. आणि इथलं पर्यटन वेगाने वाढेल असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी तिलारी येथे व्यक्त केला. 

विविध विकास कामांच्या शुभारंभ निमित्ताने ते दोडामार्ग तालुका दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, दोडामार्ग तालुका आता विकासाच्या दृष्टीने पुढे जाणारा तालुका आहे. सर्वांनी त्यात सहभागी झालं पाहिजे. तिलारी मध्ये प्रस्तावित डबल डेकर बोट पर्यटन प्रकल्प कार्यान्वित करणेबाबत नुकतच टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सोमवार पर्यंत यांच्या वर्क ऑर्डर निघतील. तर  तिलारी ते तेरवण मेढे येते प्रस्तावित असलेल्या पर्यटन प्रकल्पाचे काम पुन्हा एकदा सुरू झाल आहे. यासाठी आवश्यक निधी चांदा ते बांदा व सिंधूरत्न योजनेतून आपण उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पावसाळ्यापूर्वी हे सर्व प्रास्तावित प्रकल्प पूर्ण झालेले असतील, शिवाय याच योजने अंतर्गत ग्रामीण पर्यटन साठी अनेकांनी केलेलं हॉटेल प्रस्ताव सुद्धा मंजूर झालेलं आहेत. सहाजिकच या साऱ्या मुळे येत्या काळात येथील पर्यटन बहरलेलं असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या समवेत प जिल्हा संघटक रुपेश पावसकर राजेंद्र निंबाळकर, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, गोपाळ गवस, तिलकांचन गवस, रामदास मेस्त्री, संदीप गवस, नामदेव धरणे, गुरु सावंत आदी उपस्थित होते.

सासोलीत नेताजी सुभाष चंद्र बोस शाळेची घोषणा...!

दोडामार्ग तालुका माझ्यासाठी लहान मुलाप्रमाणे असून लहान मुलांवर नेहमीच विशेष प्रेम असतं आणि यासाठीच या लाडक्या तालुक्यात मी नेताजी सुभाष चंद्र बोस या आदर्शवत शाळेची घोषणा केली. ही आदर्श शाळा हॉस्टेलसह सासोली गावात होणार असून संपूर्ण तालुक्याला त्याचा लाभ होईल, अशी माहिती यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.